Skip to content

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना|ऑनलाइन आवेदन|एप्लीकेशन फॉर्म

माझी कन्या भाग्यश्री योजना|माझी कन्या भाग्यश्री योजना|माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र|mazi kanya bhagyashree yojana in Hindi|mazi kanya bhagyashree yojna form download|mazi kanya bhagyashree yojana application form|bhagyashree yojana application form pdf 

हाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे,  मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2014 अन्वये “सुकन्या” योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ दिनांक 01 जानेिारी, 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञेय आहेत.

तसेच केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलाांच्या मागे 894 इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन  शासन निर्णय अधिक्रमित करून “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी “सुकन्या” योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे!!!!!!

Read More »माझी कन्या भाग्यश्री योजना|ऑनलाइन आवेदन|एप्लीकेशन फॉर्म