भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना|Bhausaheb Phundkar scheme|Bhausaheb Phundkar Horticulture Plantation Scheme

फळबागांची लागवड वाढावी म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना चालू केली आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा उद्देश:

या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन या बरोबरच फळबागेच्या रुपाने शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच ही योजना शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून काही प्रमाणात हवनामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे.

या योजनेमध्ये खालील फळबागांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे..

अ.क्र.फळपिकअंतर (मी)हेक्टरी झाडे संख्याप्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा (रु.)
आंबा कलमे१० x १०१००५३,५६१/- 
आंबा कलमे (सधन लागवड)५ x ५४००१,०१,९७२/-
काजू कलमे७ x ७२००५५,५७८/-
पेरू कलमे (सधन लागवड)३ x २१६६६२०,२०९०/-
पेरू कलमे६ x ६२७७६२,२५३/-
डाळिंब कलमे४.५ x ३७४०१,०९,४८७/-
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे६ x ६२७७६२,५७८/-
संत्रा कलमे६ x ३५५५९९,७१६/-
नारळ रोपे वानावली८ x ८१५०५९,६२२/-
१०नारळ रोपे टी/डी८ x ८१५०६५,०२२/-
११सीताफळ कलमे५ x ५४००७२,५३१/-
१२आवळा कलमे७ x ७२००४९,७३५/-
१३चिंच कलमे१० x १०१००४७,३२१/-
१४जांभूळ कलमे१० x १०१००४७,३२१/-
१५कोकम कलमे७ x ७२००४७,२६०/-
१६फणस कलमे१० x १०१००४३,५९६/-
१७अंजीर कलमे४.५ x ३७४०९७,४०६/-
१८चिकू कलमे१० x १०१००५२,०६१/-

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड लाभार्थी पात्रता 

  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना देय नाही.
  • शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  • ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

[pdf-embedder url=”https://hindi.pradhanmantriyojana.in/wp-content/uploads/2018/08/mh.pdf”]

या योजनेत शेतकऱ्याने स्वतः करावयाच्या आणि शासन अनुदानीत बाबी पुढीलप्रमाणे आहेत

शासन योजनेत अनुदानीत बाबी (१००% शासन अनुदान)लाभार्थी शेतकऱ्याने स्व: खर्चाने करावयाच्या बाबी (यास शासनाचे अनुदान नाही)
झाडे लागवडीसाठी खड्डे खोदणेलागवडीसाठी जमीन तयार करणे
कलमे/रोपे लागवड करणेसुपीक माती, शेणखत मिश्रणाने खड्डे भरणे
पिक संरक्षण औषधेरासायनिक खत टाकणे
नांग्या भरणेआंतर मशागत करणे
ठिबक सिंचन बसविणेकाटेरी झाडांचे कुंपण करणे (ऐच्छिक)

योजनेत सहभागी होण्यासाठी चा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे संकेत स्थळावर उपलब्ध आहे.(www.krishi.maharashtra.gov.inया योजनेच्या सविस्तर महितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

Hi, I am Vaibhav Tiwari, the man behind this blog. I am a part-time blogger and a software developer by profession. For any query, feel free to drop your message on the contact us page.